कार्यक्रम दिनांक : नोव्हेंबर १०- १३, २०१७

पाहुण्यांचे संदेश


व्हिडिओ

वे अॅग्रोव्हिजनमध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन

 

शेती व संलग्न सेवा क्षेत्र हे देशातील सर्वाधिक लोकांच्या, विशेषतः ग्रामिण नागरिकांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे. वन व मत्स्य व्यवसाय यांचाच एकूण सकल उत्पादनातील (जीडीपी) वाटा जवळपास १५ टक्के आहे. ग्रामिण भागाचा आर्थिक विकास व अन्नसुरक्षेचा विचार करता कृषी क्षेत्राचे महत्व अनन्यसाधारण आहे. जैवविविधतेला चालना, शाश्वत विकासाचे तंत्रज्ञान आणि संसाधन संवर्धनाच्या शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब केल्यास कृषी व्यापार मोठ्या प्रमाणात वाढवण्यास मदत होवू शकते.

शेतकऱ्यांना शेती विकासाच्या असंख्य संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ज्ञान, तंत्रज्ञान मिळविण्याचे व्यासपीठ अॅग्रोव्हिजनने उपलब्ध करुन दिले आहे. गेल्या आठ यशस्वी कृषी प्रदर्शनानंतर अॅग्रोव्हिजन फाउंडेशनने शेतकऱ्यांना प्रशिक्षित, प्रोत्साहित व सबळ करण्याच्या उद्देशाने ९ व्या अॅग्रोव्हिजनचे आयोजन केले आहे.

८ व्या अॅग्रोव्हिजनची यशोगाथा
अॅग्रोव्हिजन हे मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन असून भारतीय शेतीची सद्यस्थिती व भविष्यकालिन नियोजनाचे हे सर्वोत्तम ठिकाण आहे. नागपूरमधील रेशिमबाग मैदानावर ११ नोव्हेंबर २०१६ पासून ८ व्या अॅग्रोव्हिजनला प्रारंभ झाला.शेतीतील नवसंशोधन, नाविन्यपूर्ण प्रयोग (इनोव्हेशन्स इन अॅग्रीकल्चर) ही या प्रदर्शनाची मुख्य थीम होती.

तब्बल २३ हजार चौरस मिटरवर उभारण्यात आलेले हे प्रदर्शन अॅग्रोव्हिजन मालिकेतले आत्तापर्यंतचे सर्वात मोठे कृषी प्रदर्शन होते. कृषी क्षेत्रातील ४०० हून अधिक नामांकित कंपन्यांनी यात सहभाग घेवून उत्पादने व सेवा सादर केल्या. लाखो शेतकऱ्यांनी या प्रदर्शनास भेट दिली. कृषी संबंधित सर्व क्षेत्रातील व्यक्तींच्या उदंड सहभागामुळे कृषी पंढरीचे स्वरुप आलेल्या या प्रदर्शनाचा समारोप १४ नोव्हेंबर २०१६ रोजी झाला.

प्रदर्शनाच्या चार दिवसात ३० हून अधिक मोफत प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यात शेतीत अमुलाग्र बदल घडवून आणू शकणाऱ्या ३७ महत्वाच्या विषयांवर शेतकऱ्यांना अत्याधुनिक ज्ञान, तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात आले. विविध कृषी विद्यापीठे, भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या प्रयोगशाळा, खासगी संस्थांचे ४५ शास्रज्ञ, तज्ज्ञ व प्रगत शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व यशोगाथा सादर केल्या. शेतकऱ्यांचे प्रश्न व शंकांचे निरसन करण्यासाठीही स्वतंत्रपणे खास वेळ देण्यात आला.

केंद्रिय भुपृष्ठ वाहतूक, महामार्ग व जहाज बांधणी मंत्री मा.ना.श्री. नितीन गडकरी, केंद्र व राज्य सरकारचे विविध मंत्री, प्रसिद्ध उद्योजक, धोरणकर्ते, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यापार शिष्टमंडळे, नवउद्योजक, कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी, विद्यापीठे व संशोधन संस्थांचे प्रतिनिधी व लाखो शेतकऱ्यांनी प्रदर्शनात सहभाग घेतला.

८ व्या अॅग्रोव्हिजनचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे विदर्भातील वस्रोद्योग विकास या विषयावरील एकदिवसीय चर्चासत्र. शासनाच्या योजना व वस्रोद्योगातील संधींच्या अनुषंगाने विदर्भ, मराठवाडा व खानदेशतील शेतकऱ्यांसाठी कापूस उद्योगाला चालना देण्यासाठी उपलब्ध असलेली बाजारपेठ काबिज करण्यासाठीच्या उपाययोजनांविषयी चर्चा झाली.

कोळशापासून मिथेनॉलपर्यंत या विषयावरील विशेष कार्यशाळेचेही आयोजन या प्रदर्शनात करण्यात आले. निती आयोगाचे सदस्य, जेष्ठ शास्रज्ञ डॉ. व्ही. के. सारस्वत यांनी यात मार्गदर्शन केले. याबरोबरच कृषी वनिकी शेती पद्धतीच्या अनुषंगाने बांबू लागवड व बांबू उद्योग या विषयक कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले. आत्तापर्यंतच्या सर्व प्रदर्शने, कार्यशाळा, चर्चासत्रांच्या माध्यमातून कृषीतील अत्याधुनिक तंत्रज्ञान, व्यवसाय व तंत्रज्ञानविषयक जागृती घडवण्यात अॅग्रोव्हिजन यशस्वी ठरले आहे.९ अॅग्रोव्हिजन मधील नवीन आकर्षणपशुप्रदर्शन

खास पशुप्रेमी शेतकऱ्यांसाठी यंदाच्या ९ व्या अॅग्रोव्हिजनमध्ये स्वतंत्र पशुधन दालन उभारले आहे. यामध्ये गाई, म्हशीं....


विदर्भातील दुग्धोत्पादनाच्या संधी

शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी दुग्धव्यवसायाकडे सर्वाधिक वाव असलेले महत्वाचे साधन म्हणून पाहिले जाते...


तज्ज्ञांचे चर्चासत्र

शासकीय धोरण, नियोजन आणि योजनांचा थेट परिणाम शेती व संलग्न उद्योग, व्यवसायांवर होत असतो. त्यामुळे ...

आयोजक

माध्यम सहकार्य

© कॉपीराईट २०१७, MMactiv. सर्व हक्क अभादीत .

web counter

वेबसाइट डिझाइन आणि डेव्हलप बाय : SCI Knowledge Interlinks