कार्यक्रम दिनांक : नोव्हेंबर २२ - २५, २०१९

भव्य पशु प्रदर्शन

 

अॅग्रोव्हिजनमध्ये गेल्या वर्षी प्रथमच पशुप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. देशभरातील गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या आदी विविध प्रकारचे जातीवंत, गुणवंत, किर्तीवंत पशुधनाचा यात सहभाग होता. या पार्श्वभूमीवर यंदा 10 व्या अॅग्रोव्हिजनमध्ये महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर (माफसू) व पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने अधिक भव्य स्वरुपात पशुप्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. जातीवंत जनावरांच्या प्रदर्शनासोबतच या ठिकाणी पशुपालन, दुग्धव्यवसाय व इतर संलग्न विषयांवर मार्गदर्शनपर प्रशिक्षण आयोजन करण्यात आले आहे.

प्रदर्शनात पशुधन प्रदर्शित करणाऱ्या पशुपालकांना सहभाग प्रमाणपत्र व तीन उत्कृष्ट जनावरांना पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. तज्ज्ञ निवड समितीमार्फत पुरस्कारार्थींची निवड करण्यात येईल. प्रदर्शनात आपले दर्जेदार पशुधन प्रदर्शित करण्यासाठी इच्छूक शेतकऱ्यांनी पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा.

जातीवंत उच्च उत्पादनक्षम पशुधन म्हणजे शेती, दुग्धव्यवसाय व इतर पशुधनसंलग्न व्यवसायांच्या यशाचे मुख्य सुत्र. अशा जनावरांवर शेतकरी जिवापाड प्रेम करतो. गुणवंत जनावरांचे कौतुक आणि आपल्या गोठ्याची, शेताची शान वाढविण्यााठी अशी जनावरांचे आपल्या दावणीला असावीत हा ध्यास शेतकऱ्यांना प्रगतीच्या शिखरावर घेवून जात असतो. पशुधन हे उत्पादनखर्च कपात आणि उत्पन्नवाढीचे फार मोठे साधन आहे. त्यातील उच्च गुणवत्ता, साधने, प्रकार व प्रात्यक्षिके पाहण्याची संधी प्रदर्शनास भेट देणाऱ्या दर्दी शेतकऱ्यांना पशुधन दालनात मिळेल.

पशुधन दालनात
- पशुधन विषय माहिती, नवीन तंत्रज्ञान, शासकीय योजना
- विविध जातींची सर्वोच्च उत्पादनक्षम पाळिव जनावरे
- देशी व संकरित दुधाळ गाई
- विविध जातींच्या म्हशी
- कुक्कुटपालन व इतर पक्षी
- जातीवंत शेळ्या, मेंढ्या
- संशोधन संस्था, यशस्वी व्यवसायिक सुसंवाद
- पशुधन व संलग्न व्यवसायांविषयी सविस्तर मार्गदर्शन




आयोजक

माध्यम सहकार्य

© कॉपीराईट २०१७, MMactiv. सर्व हक्क अभादीत .

web counter

वेबसाइट डिझाइन आणि डेव्हलप बाय : SCI Knowledge Interlinks