कार्यक्रम दिनांक : नोव्हेंबर २२ - २५, २०१९

एकदिवसीय परिषद

 

शासकीय धोरण, नियोजन आणि योजनांचा थेट परिणाम शेती व संलग्न उद्योग, व्यवसायांवर होत असतो. त्यामुळे या क्षेत्राच्या दुरगामी शाश्वत विकासासाठी कृषिकेंद्रीत धोरणे आखणे आणि आखलेल्या धोरणांची, योजनांची शेती व शेतकरीकेंद्रीत अंमलबजावणी होणे सर्वात महत्वाचे असते. यादृृष्टीने विदर्भातील शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासाला नवी दिशा देण्याची क्षमता असलेल्या विषयांवर अॅग्रोव्हिजनमध्ये तज्ज्ञांचे चर्चासत्र आणि विशेष एकदिवसीय परिषदेचे आयोजन केले जाते.

- एकदिवसीय परिषद
यंदा 10 व्या अॅग्रोव्हिजनमध्ये विदर्भाच्या कृषी विकासाला चालना देण्यासाठी विदर्भाचा दुग्धविकास आणि बांबू लागवड आणि संधी या विषयांवर २ एकदिवसीय परिषदा होणार आहेत. शेतकऱ्यांना अधिक उत्पन्नाच्या शाश्वत संधी उपलब्ध करुन देण्यासाठी धोरणात्मक बदलांचा पाया घालण्यासाठी परिषदांचे आयोजन होणार आहे. राज्यकर्ते, धोरणकर्ते, प्रगतशील शेतकरी, पशुपालक यांच्याबरोबरच शेती व प्रक्रिया क्षेत्राशी संबंधीत सर्वच जण यात सहभागी होणार आहेत. याव्यतिरिक्त भारतीय शेतीचे भविष्य या विषयावर तज्ज्ञांचे चर्चासत्रही आयोजित करण्यात आले आहेआयोजक

माध्यम सहकार्य

© कॉपीराईट २०१७, MMactiv. सर्व हक्क अभादीत .

web counter

वेबसाइट डिझाइन आणि डेव्हलप बाय : SCI Knowledge Interlinks