कार्यक्रम दिनांक : नोव्हेंबर २२ - २५, २०१९

भव्य राष्ट्रीय कृषी प्रदर्शन

 

अॅग्रोव्हिजनमधील आणखी एक अतिशय महत्वाचे आणि सर्व क्षेत्रांच्या, व्यक्तींच्या नजरा खिळवून ठेवणारे देशभर नावाजले जाणारे आकर्षण म्हणजे भव्य राष्ट्रीय कृषी प्रदर्शन. मध्य भारतातील शेती व शेतकऱ्यांच्या सध्याच्या व भविष्यातील गरजा लक्षात घेवून त्यांना हवं ते सर्व काही या ठिकाणी प्रदर्शित केले जाते. यात जमीनीपासून ते उत्पादन निर्यात, विक्रीपर्यंतच्या शेतीच्या मुल्य साखळीशी संबंधीत सर्व घटकांचा समावेश असतो.

देशातील व जगातील 350 हून अधिक आघाडीच्या संस्था, कंपन्यांमार्फत अत्याधुनिक तंत्रज्ञान, उत्पादने शेतकऱ्यांसाठी सादर केले जाते. प्रात्यक्षिके दाखवली जातात. तंत्रज्ञान वापराच्या अनुषंगाने कंपन्या, संस्था, तज्ज्ञांची कुशलता आणि शेतकऱ्यांचा अनुभव, प्रतिसाद यांची देवाणघेवाण होते. एकमेकांशी थेट जोडणी होवून तंत्रज्ञानाचा अतिशय वेगाने प्रसार होतो. विदर्भ, छत्तिसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश मधील शेतकरी लाखोंच्या संख्येने या कृषी ज्ञान तंत्रज्ञानाच्या महामेळ्यात सहभागी होतात. ओरिसा, हरियाना, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांतील शेतकऱ्यांचा उल्लेखनिय सहभाग असतो.

- भव्य पशुप्रदर्शन 
अॅग्रोव्हिजनमध्ये गेल्या वर्षी प्रथमच पशुप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या पार्श्वभूमीवर यंदा 10 व्या अॅग्रोव्हिजनमध्ये महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर (माफसू) व पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने अधिक भव्य स्वरुपात पशुप्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. जातीवंत जनावरांच्या प्रदर्शनासोबतच या ठिकाणी पशुपालन, दुग्धव्यवसाय व इतर संलग्न विषयांवर मार्गदर्शनपर प्रशिक्षण आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनात पशुधन प्रदर्शित करणाऱ्या पशुपालकांना सहभाग प्रमाणपत्र व तीन उत्कृष्ट जनावरांना पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. तज्ज्ञ निवड समितीमार्फत पुरस्कारार्थींची निवड करण्यात येईल. प्रदर्शनात आपले दर्जेदार पशुधन प्रदर्शित करण्यासाठी इच्छूक शेतकऱ्यांनी पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा. 

प्रदर्शनातील महत्वाची दालने
- कृषी यंत्रे व औजारे, औषधे, रसायने, सिंचन व जल व्यवस्थापन, बियाणे, वित्त संस्था
- केंद्रीय पातळीवरील कृषी संशोधन संस्था, कृषि व संलग्न विद्यापीठे, कृषि विज्ञान केंद्रे
- जैवउर्जा, अपारंपरिक उर्जा, पॉलिहाऊस, शेडनेट, पशुधन व पशुवैद्यकीय सेवा
- वित्तपुरवठा व विमा, स्वयंसेवी संस्था, सल्ला व प्रशिक्षण, साठवणूक व प्रक्रिया
- वाहतूक व विपणन, खरेदी विक्री, सरकारी योजना व अनुदान इ.

कृषी उद्योगांसाठी
- स्टार्टअप स्टेजमधील अॅग्रो बिझनेससाठी स्वतंत्र दालन
- चार दिवसात लाखो प्रगतशील शेतकऱ्यांपर्यंत थेट पोचण्याची संधी
- व्यवसाय वाढीसाठीचे नवीन संबंध, लिंकेजेस करण्याची संधी
- कंपनीची उत्पादने, विश्वासाहार्यता शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरण्याची संधी

शेतकऱ्यांसाठी... 
- शेती विकासासाठी हवे ते सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान, माहिती, साधने, एकाच ठिकाणी उपलब्ध
- एकाच प्रकारच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या उत्पादनांची तुलना करण्याची, स्वतःच्या कसोटीवर जोखण्याची संधी
- कृषी संशोधन संस्था, शास्त्रज्ञ, यांच्याशी थेट जोडणी करण्याची, सुसंवाद साधण्याची व मार्गदर्शन मिळविण्याची संधी
- शाश्वत शेतीच्या नव्या वाटा, नव्या दिशांचा धांडोळा, समस्यांवर उपाय मिळविण्याचे माध्यम


राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात...
कृषी जैवतंत्रज्ञान, बियाणे, कृषी यंत्रे व अवजारे, खते व किडनाशके, सिंचन व जल तंत्रज्ञान, उती संवर्धन, पाणलोट व्यवस्थापन, अन्नद्रव्ये, फलोत्पादन, फुलोत्पादन, मत्स्यपालन, काढणी पश्चात तंत्रज्ञान, हरितगृह व शेडनेट, बागकाम औजारे, सौर यंत्रे (पंप, प्रकाश व्यवस्था इ) , दुग्ध व्यवसाय उपकरणे उत्पादक, पशुवैद्यकीय औषधे, औषधी वनस्पती शेती, मधुमक्षिकापालन, रेशीमपालन, पिक संरक्षक, शेतमाल प्रक्रिया उत्पादने, मुल्यवर्धन, निवड व प्रतवारी यंत्रे, पॅकेजिंग तंत्रज्ञान व सेवा, बार कोड व इंक कोड तंत्रज्ञान, डिजीटल टेंप्रेचर कंट्रोलर व डाटा लॉगर, कृषी उत्पादनांचे घाऊक व किरकोळ विक्रेते, विद्युत साधने, कृषी ड्रोन तंत्रज्ञान, इलेव्हेटर, कन्व्हेअर, रोटरी सेपरेटर, आधुनिक बैलगाडी, पशुचलित औजारे, वाहतूक साधने, हात औजारे, अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान व सेवा, प्लास्टिक क्रेट व उपकरणे, मल्चिंग तंत्रज्ञान, काटेकोर शेती उत्पादने, पॉवर व इतर उपकरणे, पेरणी व लागवड यंत्रे, ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलीत यंत्र-औजारे, मळणी यंत्रे, भाजीपाला व कंद पिके काढणी यंत्रे, तण निर्मुलन यंत्रे, कृषीविषयक वितरक व साठेदार, साठवण यंत्रणा निर्माते व पुरवठादार, कृषी पणन मंडळ, शेतमाल वाहतूक व शेतगृह यंत्रणा, गोदामे, पडीक जमीन विकास, जैव इंधन व जैव उर्जा संसाधने, सेंद्रीय शेती, करार शेती, एकात्मिक शेती, अपारंपरीक उर्जा, कषी पर्यटन, रिटेल चेन समुह, माहिती तंत्रज्ञान प्रसार, कृषी विमा, कृषी वित्तपुरवठा, शेती सेवा, उभारणीयोग्य प्रकल्प सेवा, स्वयंसेवी संस्था, विपनन व आयात निर्यात सेवा, कृषी व्यवसाय, व्यापार, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शासकीय विभाग, कृषी विद्यापीठे, संशोधन संस्था, उद्योग, केंद्र व राज्य सरकार इ.आयोजक

माध्यम सहकार्य

© कॉपीराईट २०१७, MMactiv. सर्व हक्क अभादीत .

web counter

वेबसाइट डिझाइन आणि डेव्हलप बाय : SCI Knowledge Interlinks