कार्यक्रम दिनांक : नोव्हेंबर २२ - २५, २०१९

भव्य पशुधन दालन

 

खास पशुप्रेमी शेतकऱ्यांसाठी अॅग्रोव्हिजनमध्ये स्वतंत्र पशुधन दालन उभारण्यात येते. देशभरातील गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या आदी विविध प्रकारचे जातीवंत, गुणवंत, किर्तीवंत पशुधनाचा यात सहभाग होता. गेल्या वर्षी 9 व्या अॅग्रोव्हिजनमध्ये प्रथमच आयोजित केलेल्या या पशुप्रदर्शनास शेतकऱ्यांनी उदंड प्रतिसाद दिला. या पार्श्वभूमीवर यंदा 10 व्या अॅग्रोव्हिजनमध्येही पशुप्रदर्शनाचे स्वतंत्र दालन उभारण्यात येणार आहे.

जातीवंत उच्च उत्पादनक्षम पशुधन म्हणजे शेती, दुग्धव्यवसाय व इतर पशुधनसंलग्न व्यवसायांच्या यशाचे मुख्य सुत्र. अशा जनावरांवर शेतकरी जिवापाड प्रेम करतो. गुणवंत जनावरांचे कौतुक आणि आपल्या गोठ्याची, शेताची शान वाढविण्यााठी अशी जनावरांचे आपल्या दावणीला असावीत हा ध्यास शेतकऱ्यांना प्रगतीच्या शिखरावर घेवून जात असतो. पशुधन हे उत्पादनखर्च कपात आणि उत्पन्नवाढीचे फार मोठे साधन आहे. त्यातील उच्च गुणवत्ता, साधने, प्रकार व प्रात्यक्षिके पाहण्याची संधी प्रदर्शनास भेट देणाऱ्या दर्दी शेतकऱ्यांना पशुधन दालनात मिळेल.

पशुधन दालनात
- पशुधन विषय माहिती, नवीन तंत्रज्ञान, शासकीय योजना
- विविध जातींची सर्वोच्च उत्पादनक्षम पाळिव जनावरे
- देशी व संकरित दुधाळ गाई
- विविध जातींच्या म्हशी
- कुक्कुटपालन व इतर पक्षी
- जातीवंत शेळ्या, मेंढ्या
- संशोधन संस्था, यशस्वी व्यवसायिक सुसंवाद
- पशुधन व संलग्न व्यवसायांविषयी सविस्तर मार्गदर्शनआयोजक

माध्यम सहकार्य

© कॉपीराईट २०१७, MMactiv. सर्व हक्क अभादीत .

web counter

वेबसाइट डिझाइन आणि डेव्हलप बाय : SCI Knowledge Interlinks