कार्यक्रम दिनांक : नोव्हेंबर २२ - २५, २०१९

कार्यशाळा

 

शेतकऱ्यांसाठीच्या कार्यशाळा हा अॅग्रोव्हिजनचा आत्मा आहे. शेतकऱ्यांना शिक्षित, प्रोत्साहित सबल करण्याच्या प्रक्रियेचा तो गाभा आहे. तांत्रिक विषयावरील मार्गदर्शन शेतकऱ्यांच्या यशोगाथा सादरीकरणातून शेतीच्या शाश्वत विकासाची दिशा, मार्गदर्शन प्रोत्साहन या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळते. खास या कार्यशाळांचा लाभ घेण्यासाठी दर वर्षी हजारो शेतकरी प्रदर्शनात सहभागी होतात.

नेहमीप्रमाणेच यंदाच्या 10 व्या अॅग्रोव्हिजनमध्येही प्रदर्शनस्थळी तीन स्वतंत्र सभागृहांमध्ये विविध विषयांवरील कार्यशाळा होणार आहेत. शेतकरी बांधव आपल्या गरजेनुसार, आवडीनुसार हव्या त्या कार्यशाळांचा लाभ घेवू शकतील. कार्यशाळांमध्ये मांडल्या जाणाऱ्या विषयांच्या अनुषंगाने प्रदर्शनात अत्याधुनिक तंत्रज्ञान सादर करण्यात येणार असल्याने मार्गदर्शन, प्रशिक्षण प्रात्यक्षिक हे शेती विकासाचे तीनही महत्वाचे टप्पे एकाच ठिकाणी पार पाडण्याची संधी सहभागी शेतकऱ्यांना मिळणार आहे.

अॅग्रोव्हिजन 2018 मधील नियोजित कार्यशाळा

कार्यशाळा (दीड तास कालावधी)
1) दर्जेदार कापूस उत्पादन 
- गुलाबी बोंडअळी नियंत्रण, सर्जिकल कॉटन उत्पादन इ.

2) जवस उत्पादन व मुल्यवर्धन
- सर्वोच्च ऊस उत्पादनाची गुरुकिल्ली, आधुनिक तंत्रज्ञान, उपलब्ध योजना, अर्थकारण इ.

3) जैविक शेती, जैविक निविष्ठा उत्पादन व वापर 

4) शेळी व मेंढीपालन
- व्यवसायिक संधी, शेळ्यांचे प्रकार व संगोपन, गोठा व्यवस्थापन, आजार व नियंत्रण, विक्री व्यवस्था इ.

5) रेशीमशेती

- व्यवसायिक संधी, शासकीय योजना, आधुनिक तंत्रज्ञान, यशस्वी उद्योजक, शेतकऱ्यांचे यशोगाथा सादरीकरण इ.

6) मधमाशीपालन

- मधमाशीपालन व्यवसायातील संधी, पिक उत्पादनवाढीतील मधमाशांचे महत्व, यशस्वी मधमाशीपालन करणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा, वार्तालाप इ.

7) सुक्ष्म सिंचन

- ठिबक व तुषार सिंचन पद्धती, नवीन तंत्रज्ञान, पिकनिहाय गरज व रचना इ.

8) हरितगृह व शेडनेट

- हरितगृह तंत्रज्ञान ओळख, हरितगृह उभारणी, नियंत्रित शेतीचे फायदे, पिके व उत्पादन पद्धती, विक्री व्यवस्था इ.

9) किटकनाशकांचा योग्य वापर

10) कृषी वित्तपुरवठा, अर्थसहाय्य
- शेतकऱ्यांसाठीच्या बॅकांच्या योजना, नाबार्डमार्फतचे अर्थसहाय्य, आर्थिक व्यवस्थापन, अर्थकारणातील बारकावे इ.

11) जलसंधारण व जलयुक्त शिवार
- गरज, उपचार, पद्धती, जलयुक्त शिवार व इतर शासकीय योजना, तांत्रिक मापदंड, दिर्घकालिन उपाययोजना, यशोगाथा इ.

12) शेतकरी उत्पादक कंपनी, गट शेती

13) नैसर्गिक शेती

14) डिजीटल पेमेंट, धोके व उपाय


15) भाजीपाला बिजोत्पादन


विस्तृत कार्यशाळा (प्रत्येकी 3 तास कालावधी)
1) फुलशेती
- फुलशेतीची व्यवसायिक स्थिती, बलस्थाने, कमकुवत दुवे व संधी, आधुनिक तंत्रज्ञान, शासकीय योजना इ.

2) हळद व आले लागवड

- नवीन नगदी पिक म्हणून हळद व आले पिकांचा पर्याय, उत्पादनशास्र, व्यवस्थापन, मार्केटिंग, प्रक्रिया

3) संत्रा प्रक्रिया
- संत्रा पिकाची सद्यस्थिती, नवीन तंत्रज्ञान, अभिनव प्रकल्प, मुल्यवर्धनातील संधी इ.


4) सेंद्रीय शेती 

- सेंद्रीय शेतीची मुलतत्वे, रासयनिक शेतीचे सेंद्रीय शेतीत रुपांतर, फायदे, विक्री पद्धती, प्रमाणिकरण इ.

5) मत्स्यपालन, निर्यात संधी

- शेततळे व तलावातील मत्स्यपालन, नवीन तंत्रज्ञान, शासकीय योजना, नवीन जाती, खाद्य व्यवस्थापन, विक्री इ.

6) कुक्कुटपालन
- सद्यस्थिती, बदलते स्वरुप, दिशा, नवीन तंत्रज्ञान, व्यवसायिक संधी, बाजारपेठ, खाद्यनिर्मिती व संलग्न संधी इ.

टीप - कार्यशाळांच्या विषयात बदल किंवा वाढ होऊ शकते. विषयनिहाय वेळापत्रक संभाव्य बदल या ठिकाणी वेळोवेळी अपडेट करण्यात येतील.आयोजक

माध्यम सहकार्य

© कॉपीराईट २०१७, MMactiv. सर्व हक्क अभादीत .

web counter

वेबसाइट डिझाइन आणि डेव्हलप बाय : SCI Knowledge Interlinks