कार्यक्रम दिनांक : नोव्हेंबर २२ - २५, २०१९

आयोजक

 

अॅग्रोव्हिजन फाउंडेशन

अॅग्रोव्हिजन फाउंडेशन ही शेती व शेतकऱ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे. अद्ययावत, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्पादकतावाढ, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन, सेंद्रीय शेती विकास, पिक पद्धतीला सुयोग्य पर्याय उपलब्ध करणे, पशुसंगोपन व इतर पुरक व्यवसायांच्या माध्यमातून शेती अधिक नफ्याची व शाश्वत करण्यासाठी शेतकऱ्यांना पाठबळ देण्याच्या उद्देशाने फाऊंडेशन कार्यरत आहे. फाऊंडेशनच्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रामार्फत राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी विविध विषयांवरील प्रशिक्षण कार्यशाळा, चर्चासत्रे, परिसंवादांचे सातत्याने आयोजन केले जाते. शेतीच्या मुल्य साखळीतील कमकुवत दुवे बळकट करण्यासाठी आवश्यक त्या सर्व विषयांचे, तंत्रज्ञानाचे, कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्याचे कार्य यामाध्यमातून केले जाते. पिक उत्पादन, मुल्यवर्धन, फुलशेती, रेशिमशेती, मधमाशीपालन, शेळीपालन, डाळिंब उत्पादन, कुक्कुटपालन, जैविक खतांचा वापर, मत्स्यपालन आदी विषयांवरील शेकडो कार्यशाळा फाऊंडेशनमार्फत घेण्यात आल्या असून हजारो शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला आहे.

 

एमएम अक्टिव सायटेक कम्युनिकेशन्स

एमएम अक्टिव ही भारतातील आघाडीची इव्हेन्ट ऑर्गनायझिंग कंपनी आहे. कंपनीमार्फत दर वर्षी कृषीतंत्रज्ञान, कॉफी, जैवतंत्रज्ञान, संशोधन व विकास, उच्च शिक्षण, पाणी, अपारंपरिक उर्जा, सस्टेनेबल केमिस्ट्री, ट्रान्स्पोर्ट अड लॉजिस्टिक, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स, नॅनोटेक्नॉलॉजी, स्पेस टेक्नॉलॉजी आदी विषयांतील १०० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन केले जाते. याशिवाय बायोस्पेक्ट्रम (आशिया व इंडिया) आणि न्यु फुड्सस्पेक्ट्रम ही देशातील आघाडीची उद्योजकीय मासिकेही कंपनीमार्फत प्रसिद्ध करण्यात येतात.

 

पूर्ती उद्योगसमुह

साखर, उर्जानिर्मिती, रिटेल मार्केटिंग या क्षेत्रात हा उद्योगसमुह कार्यरत आहे. ग्रामिण विकासातून राष्ट्रविकास हे पुर्ती समुहाचे मुख्य धोरण व उद्दीष्ट असून केंद्रीय वाहतूक व जलसंपदामंत्री नितिन गडकरी हे या समुहाचे प्रवर्तक आहेत. समुहामार्फत देशभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. समुहाचे विदर्भात तीन साखर कारखाने व एक उर्जानिर्मिती प्रकल्प कार्यरत आहे. समुहामार्फत स्वतःचा सुपरबझार चालविण्यात येत असून शेतकरी व ग्रामविकासासंबंधीत विविध क्षेत्रांमध्ये उपक्रम सुरु आहेत.

 

विदर्भ आर्थिक विकास परिषद (वेद)

विदर्भाच्या सर्वांगिण आर्थिक विकासासाठी समविचारी उद्योजक, व्यवसायिक यांनी एकत्र येवून विदर्भ आर्थिक विकास परिषदेची स्थापना केलेली आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा निसर्गपुरक वापर, पायाभूत सुविधा विकास, बौद्धिक संपदा विकास आदींसाठी संस्थेमार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी राजकीय नेते, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, केंद्र व राज्य सरकार, प्रशासन, लोकप्रतिनिधी या सर्वांच्या सहकार्याने परिषदेमार्फत विदर्भाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

 

महाराष्ट्र आर्थिक विकास परिषद (MEDC)

जेष्ठ अर्थशास्त्रज्ञ डॉ. धनंजयराव गाडगिळ यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील उद्योजकांच्या संघटनांच्या सहभागाने महाराष्ट्राच्या वेगवान संतुलित विकासासाठी १९५७ साली महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेची स्थापना झाली. परिषद राज्य सरकारसाठी औद्योगिक विकासासाठी थिंट टॅंक म्हणून काम करते. स्थापनेपासूनच राज्यातील आघाडीच्या, दुरदृष्टीच्या उद्योगपतींनी परिषदेत महत्वाची पदे भुषवत महत्वपूर्ण योगदान दिले आहे. यामुळे औद्योगिक संशोधन व विकासात ही संस्था फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशात अग्रणी म्हणून ओळखली जाते.

 

सल्लागार समिती

१) डॉ. सी. डी. मायी (अध्यक्ष, सल्लागार समिती) माजी अध्यक्ष, कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळ, नवी दिल्ली
२) डॉ. विलास भाले, कुलगुरु, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
३) श्री. दिलीप रथ, अध्यक्ष, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड
४) डॉ. आशिष पातुरकर, कुलगुरु, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर
५) डॉ. अशोक ढवण, कुलगुरु, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
६) डॉ. एम. एस. लदानिया, संचालक, नॅशनल रिसर्च सेंटर फॉर सिट्रस, नागपूर
७) डॉ. सुरेंद्रकुमार सिंग, संचालक, राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व जमीन वापर नियोजन ब्युरो, नागपूर
८) डॉ. पी. जी. पाटील, संचालक, केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था, मुंबई
९) डॉ. व्ही. एन. वाघमारे, संचालक, केंद्रीय कापूस संशोधन संस्था
१०) श्री. देवेंद्र पारेख, अध्यक्ष, विदर्भ आर्थिक विकास परिषद, नागपूर
११) डॉ. दिपक नाईक, अध्यक्ष, महाराष्ट्र आर्थिक विकास परिषद
१२) डॉ. लक्ष्मिकांत कलंत्री, माजी संचालक, रेशिम संचलनालय, नागपूर


संयोजक
१) श्री. गिरिष गांधी, माजी आमदार

 

आयोजन सचिव
१) रवी बोरटकर, अध्यक्ष, अॅग्रोव्हिजन फाऊंडेशन, नागपूर
२) रमेश मानकर, खजिनदार, अॅग्रोव्हिजन फाऊंडेशन, नागपूरआयोजक

माध्यम सहकार्य

© कॉपीराईट २०१७, MMactiv. सर्व हक्क अभादीत .

web counter

वेबसाइट डिझाइन आणि डेव्हलप बाय : SCI Knowledge Interlinks