कार्यक्रम दिनांक : नोव्हेंबर २७ - ३० , २०२०

पाहुण्यांचे संदेश

व्हिडिओ

10 वे अॅग्रोव्हिजनमध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन

 

शेती क्षेत्राच्या बाबतीत भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे राष्ट्र आहे. मसाले, कडधान्ये, दुध, चहा, काजू व ज्युटचे जगात सर्वाधिक उत्पादन भारतात होते. गहू, भात, फळे व भाजीपाला, ऊस, कापूस व तेलबिया उत्पादनात आपण जगात दुसऱ्या क्रमांकावर आहोत. पुढील चार वर्षात 2022 पर्यंत देशाच्या शेती उत्पन्नात दुपटीने वाढ होणे अपेक्षित आहे. शेतीसाठीच्या पायाभूत सुविधांमधील वाढलेल्या गुंतवणूकीमुळे येत्या काही वर्षात देशाच्या कृषी क्षेत्राची स्थिती वेगाने बदलणे अपेक्षित आहे. अशा स्थितीतही अत्याधुनिक शास्रिय पद्धतींच्या वापराचा अभाव आणि आधुनिक यंत्र अवजारांची अनुपलब्धता हे शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासातला प्रमुख अडथळे ठरत आहेत. केंद्रीय मंत्री मा.ना.श्री. नितिन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना प्रोत्साहित, प्रशिक्षित व सबळ करणारी अॅग्रोव्हिजन नावाची ही चळवळ काही वर्षांपूर्वी सुरु झाली. अॅग्रोव्हिजनने आपल्या गेल्या नऊ वर्षांच्या योगदानातून शेतकऱ्यांप्रती समर्पित वाटचालीचा नवा प्रवाह प्रस्थापित केला आहे.

अॅग्रोव्हिजन हा शेतकऱ्यांसाठीच्या मोफत कार्यशाळा, प्रदर्शन व चर्चासत्रे यांचा अनोखा संगम आहे. शेतकरी व कृषी उद्योगांना अगणित संधी उपलब्ध करुन देणारे ते मध्य भारतातील सर्वात सर्वोत्कृष्ट व्यासपिठ आहे. चार दिवस चालणाऱ्या कृषी ज्ञान तंत्रज्ञान प्रसार व परिवर्तनाच्या या महोत्सवात देशाच्या सर्व भागातून शेतकरी सहभागी होतात. वर्षागणिक अॅग्रोव्हिजनचा आकार व त्याचा शेतकरी आणि संलग्न घटकांच्या जीवनातील प्रभाव वाढत असून अल्पावधितच ते भारतातील कृषी तंत्रज्ञान प्रसाराचा सर्वात मोठा महोत्सव होण्याच्या दिशेने आश्वासक वाटचाल करत आहे. अॅग्रोव्हिजनचे 10 वे पर्व... 10 वे अॅग्रोव्हिजन येत्या 23 ते 26 नोव्हेंबर 2018 दरम्यान, नागपूर (महाराष्ट्र) येथे आयोजित करण्यात आले आहे.१० अॅग्रोव्हिजन मधील नवीन आकर्षणपशुप्रदर्शन

खास पशुप्रेमी शेतकऱ्यांसाठी अॅग्रोव्हिजनमध्ये स्वतंत्र पशुधन दालन उभारण्यात येते. देशभरातील गाई, म्हशी....


विदर्भातील दुग्धोत्पादनाच्या संधी

शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी दुग्धव्यवसायाकडे सर्वाधिक वाव असलेले महत्वाचे साधन म्हणून पाहिले जाते...


तज्ज्ञांचे चर्चासत्र

शासकीय धोरण, नियोजन आणि योजनांचा थेट परिणाम शेती व संलग्न उद्योग, व्यवसायांवर होत असतो. त्यामुळे ...

आयोजक

माध्यम सहकार्य

© कॉपीराईट २०१७, MMactiv. सर्व हक्क अभादीत .

web counter

वेबसाइट डिझाइन आणि डेव्हलप बाय : SCI Knowledge Interlinks