कार्यक्रम दिनांक : नोव्हेंबर २२ - २५, २०१९

मान्यवरांचे संदेश

 

श्री. देवेंद्र फडणविस, मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
अॅग्रोव्हिजनने हा खऱ्या अर्थाने कृषी ज्ञानाचा सण असून त्याने सातत्याने मध्य भारतातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवला आहे. अॅग्रोव्हिजनने कार्यशाळांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शिक्षित करुन आणि प्रदर्शनाच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान, आधुनिक शेती पद्धतीविषयी जागृती करुन उत्पादन वाढविण्यात खुप मोलाची भुमिका पार पाडली आहे. स्थानिक व राष्ट्रीय पातळीवर कंपन्या, संस्थांना लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याचे हे महत्वाचे व्यासपिठ आहे.


श्री. नितीन गडकरी, मुख्य प्रवर्तक, अॅग्रोव्हिजन, मा. मंत्री, जलसंपदा, भुपृष्ठ वाहतुक, महामार्ग व जहाज बांधणी, भारत सरकार
अॅग्रोव्हिजन गेल्या नऊ वर्षांपासून शेतकऱ्यांना शेतीविषयी शिक्षित, प्रशिक्षित करत आहे. शेतकरी या व्यासपिठावर अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी शिकले आहेत. अॅग्रोव्हिजनच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा तंत्रज्ञानाविषयाचा आत्मविश्वास वाढून विदर्भाच्या कोरडवाहू भागातील शेतीचा चेहरामोहरा बदलेल, अशी मला आशा आहे. विदर्भातील बहुतेक शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध करण्याचा माझा प्रयत्न आहे. यातूनच आपण शेतकऱ्यांच्या मुख्य समस्या सोडवू शकतो, असा मला विश्वास वाटतो.


श्री. राधामोहन सिंग, केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याणमंत्री, भारत सरकार

अॅग्रोव्हिजनमधील माहिती व व्यवसायिक शेतीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने भरलेली दालने पाहून मी रोमांचित झालो. कार्यशाळा व चर्चासत्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अगदी कोरडवाहू शेतीसह सर्व प्रकारची शेती नफ्याची करण्यासाठीच्या दुर्मिळ संधी उपलब्ध होत आहेत.


श्रीमती हरसिमरत कौर बादल, केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री, भारत सरकार
शेतकरी व नवउद्योजकांना अन्न प्रक्रिया उद्योगाविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या संधी उपलब्ध करुन देणारे एकमेकाद्वितीय व्यासपीठ आहे.


श्री. चंद्रशेखर बावनकुळे, उर्जामंत्री, महाराष्ट्र सरकार
विदर्भ शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संकटात सापडलेला आहे. दर वर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या अॅग्रोव्हिजनमधून शेतकऱ्यांना संकटातून, तणावातून बाहेर काढून शेतीच्या प्रगतीसाठी सरकारमार्फत शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून राबविण्यात येत असलेल्या दुरगामी प्रयत्नांना बळ मिळत आहे.


डॉ. सी. डी. मायी, अध्यक्ष, सल्लागार समिती, अॅग्रोव्हिजन
प्रशिक्षण, प्रोत्साहन व तंत्रज्ञान प्रसाराच्या माध्यमातून शेतीच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न अॅग्रोव्हिजन करत आहे. गेल्या आठ अॅग्रोव्हिजन मधून प्रेरणा व प्रशिक्षण घेवून विदर्भाच्या कानाकोपऱ्यात अनेक शेतकऱ्यांच्या यशोगाथा घडल्या आहेत. विदर्भासह मध्य भारताच्या कृषी विकासाला नवसंजिवनी देण्याचे कार्य अॅग्रोव्हिजन मार्फत सुरु आहे.


श्री. रवी बोरटकर, आयोजन सचिव, अॅग्रोव्हिजन, व्यवस्थापकीय संचालक, एमएम अॅक्टिव सायटेक कम्युनिकेशन्स
अॅग्रोव्हिजनचा प्रवास नऊ वर्षापूर्वी सुरु झाला आणि अल्पावधितच ते कृषी तंत्रज्ञानाचा मध्य भारतातील सर्वात मोठा महोत्सव म्हणून लोकप्रिय झाले. फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील उत्तमोत्तम तंत्रज्ञान, उत्पादने, सेवा व अद्ययावत पद्धती अॅग्रोव्हिजनमध्ये शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी उपलब्ध होतात. नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणाऱ्या कार्यशाळा, तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके व प्रत्यय पाहण्यासाठी प्रदर्शन आणि धोऱणात्मक अडचणी सोडविण्यासाठी चर्चासत्रे असे शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी हवे ते सर्व काही उपलब्ध करणारे आणि उद्योगांनाही व्यवसायवृद्धीच्या अगणित संधी देणारे अॅग्रोव्हिजन हे एकमेकाद्वितीय आहे.आयोजक

माध्यम सहकार्य

© कॉपीराईट २०१७, MMactiv. सर्व हक्क अभादीत .

web counter

वेबसाइट डिझाइन आणि डेव्हलप बाय : SCI Knowledge Interlinks