English : मराठी   

७ व्या ' अॅग्रोव्हिजन' ला गर्दीचा उच्चांक,

५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी पहिले प्रदर्शन. ६० हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी घेतला कार्यशाळांचा लाभ



राज्यातील दुष्काळी परिस्थितीतही शेतकऱ्यांची शेतीविषयीची आणि शेतीतील प्रगतीविषयीबद्दल माहिती घेण्याची आस जराही कमी झालेली नाही हे ७व्या अॅग्रोव्हिजनमध्ये दिसून आले. गरजांची आणि अडचणींची जाणीव असणाऱ्या शेतकरी बंधूंमध्ये त्यांची पूर्तता आणि अडचणींतून बाहेर पडण्याचा मार्ग याबाबत कमालीची जागरूकता असल्याचे निदर्शनास आले. अॅग्रोव्हिजन मधील प्रदर्शन आणि कार्यशाळा हे यात महत्वाची भूमिका बजावत असल्याचे अनेक सहभागी शेतकऱ्यांनी सांगितले.

११ ते १४ डिसेंबर २०१५ दरम्यानं पार पडलेल्या या मध्य भारतातील सर्वात मोठ्या कृषी उपक्रमाकडे शेतकरी 'नॉलेज सेंटर' म्हणून पाहात आहे

७व्या अॅग्रोव्हिजनची वैशिष्ट्ये
- मध्य भारतातील सर्वात मोठा शेतीविषयक उपक्रम
- ५लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांची उपस्थिती
- ३०० पेक्षा अधिक कंपन्यांचा प्रदर्शनात सहभाग
- ६० हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांना कार्यशाळांचा लाभ
- शेतीविषयक महत्वाच्या अशा ४२ विषयांवर कार्यशाळा
- देशभरातून ५२ तज्ज्ञांकडून कार्यशाळांमधून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
- २० यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा
- दुग्धव्यवसायावर एक दिवसीय परिषद
- १२ हजार चौ. मीटर्स वर भव्य प्रदर्शन

ताज्या बातम्या

प्रमुख आधारस्तंभ


फेसबुक

ट्विटर

संयोजक

माध्यम प्रायोजक