English : मराठी   

अॅग्रोव्हीजनविषयी


'बळीराजा सुखी तर सर्व जग सुखी'
शेती व्यवसाय म्हणून फायदेशीर करण्यासाठी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जास्त उत्पादन देणाऱ्या बियाणांच्या, रोपांच्या जाती, तज्ज्ञांचे मार्गदर्शन याबरोबरच जोडधंद्याची साथ यांचा समावेश करण्याची गरज निर्माण झाली आहे. पारंपरिक पद्धतीने शेती करण्यातील त्रुटी आणि तोटे दूर करून उत्पादन वाढ हि प्राथमिक गरज ठरू लागली आहे. विदर्भ आणि मध्य भारतात अशा नवीन दृष्टिकोनातून केलेल्या शेतीची आत्यंतिक गरज आहे. 'अॅग्रोव्हिजन' हे लक्षात घेऊनच गेली सात वर्षे हा उपक्रम करीत आहे. केवळ शेतकऱ्यांसाठी सुरु केलेला हा मध्य भारतातील सर्वात मोठा उपक्रम आहे.


संकल्पना
शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला असून शेती हा व्यवसाय म्हणून केला जात आहे. परंतु नैसर्गिक तसेच मानवनिर्मित घटकांवर अवलंबून असलेल्या शेतीत अनेक संधी असूनही शेतकऱ्यांवर काही मर्यादा येतात. याचा अभ्यास करून शेतकऱ्यांचे जीवनमान शाश्वत बनविणे तसेच त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविणे यादृष्टीने अॅग्रोव्हिजन काम करत आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याच्या हेतूनेच दरवर्षी अॅग्रोव्हिजनचे आयोजन करण्यात येते.


उद्दीष्ट
शेतकऱ्यांना शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाबाबत शिक्षित करणे, प्रोत्साहीत करणे आणि त्यांचे सबलीकरण करणे हेच अॅग्रोव्हिजनचे मुख्य उद्दीष्ट आहे. येत्या ११ ते १४ नोव्हेंबर २०१६ला सुरु होणारी 'अॅग्रोव्हिजन' ची ८वी आवृत्ती असेल.


अॅग्रोव्हिजनचे चे स्वरूप
चार दिवसांचे शेतीविषयक भव्य प्रदर्शन, शेतकऱ्यांसाठी विविध विषयांवर मोफत कार्यशाळा, शेतीसंबंधीत महत्वाच्या विषयावर परिसंवाद
अॅग्रोव्हिजनचे प्रमुख आधारस्तंभ मा. श्री. नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या उपक्रमाला मध्य भारतातून सुमारे चार लाखांहून अधिक शेतकरी दरवर्षी भेट देतात. डिसेंबर २०१५ मध्ये ७व्या अॅग्रोव्हिजन प्रदर्शनाला सुमारे ५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी भेट दिली, तर ६0 हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी मोफत कार्यशाळांचा लाभ घेतला. माती परीक्षण, पाणी, खते, अवजारे, शेतीतील नवनवीन आधुनिक माहिती, तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी अधिकाधिक शेतकरी, संशोधक उद्योजक आणि इतर लोकांनी आवर्जून या प्रदर्शनाला भेट दिली.
आत्तापर्यंतच्या सर्वच अॅग्रोव्हिजन प्रदर्शनांना मिळालेल्या उत्तुंग प्रतिसादानंतर नागपूर येथे


का ठरतेय अॅग्रोव्हिजन महत्त्वाचे व्यासपीठ
सुमारे १२ हजार चौ.मी.जागेवर बंदीस्त स्वरूपात तर तीन हजार चौ.मी.मोकळ्या मैदानावर मध्य भारतातील सर्वात मोठे शेतीविषयक प्रदर्शन
विदर्भ मराठवाड्याबरोबरच आंध्र प्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक येथील शेतकऱ्यांनाही फायदा
देशातील महत्वाच्या राज्यातून शेतकऱ्यांची प्रदर्शनाला भेट.
देशभरातून शेती उत्पादने सेवा देणाऱ्या कंपन्यांचा प्रदर्शनात सहभाग
शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर मोफत कार्यशाळांचे आयोजन
शेतीबरोबरच जोडधंद्यांचे महत्व सांगणाऱ्या कार्यशाळा
सुमारे ६० हजाराहून अधिक शेतकऱ्यांची कार्यशाळेला उपस्थिती
देशभरातून तज्ज्ञांचे कार्यशाळांमध्ये सहभाग आणि मार्गदर्शन
नवी दिल्लीच्या भारतीय कृषी संशोधन परिषद, भारतीय कृषी संशोधन संस्था, कृषी विद्यापीठे आणि कृषी उद्योगातील तज्ज्ञांकडून कार्यशाळांमधून मार्गदर्शन
तळागाळातील शेतकऱ्यांना मिळाली कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती
शेतीविषयक महत्वाच्या विषयावर तज्ज्ञांची एक दिवसीय परिषद.

 

८व्या अॅग्रोव्हिजनची प्रमुख आकर्षणे

• कडधान्य , कापूस आणि टेक्सटाईल विषयावर एक दिवसीय परिषद

• डेअरी, पोल्ट्री, कडधान्य उत्पादन, संत्री, हळद, आले लागवड व डाळिंब, जवस अशा महत्वाच्या विषयांवर जास्त कालावधीच्या विशेष कार्यशाळा
विदर्भात उच्च तंत्रज्ञानावर आधारित फुलशेती, शेडनेटमधील शेती, रेशीमशेती , मेंढी पालन मत्स्यव्यवसाय अशा उपयुक्त विविध विषयांवर तीसहून अधिक कार्यशाळांचे आयोजन यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा

राष्ट्रीय स्तरावरील शेतीविषयक उत्पादने आणि सेवा यांचे भव्य प्रदर्शन

तेव्हा अॅग्रोव्हिजन प्रदर्शनाला नक्की भेट द्या आणि आपल्या शेतीव्यवसायाच्या प्रगतीसाठीचे विविध पर्याय जाणून घ्या अॅग्रोव्हिजनचा एक घटक बना...!

 

फेसबुक

ट्विटर

संयोजक

माध्यम प्रायोजक