English : मराठी   

राष्ट्रीय प्रदर्शन


आधुनिक पद्धतीने शेती करण्याकडे आणि शेतीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहण्याकडे हल्ली शेतकऱ्यांचा कल मोठ्याप्रमाणात वाढत आहे. त्यामुळे शेतीमध्ये आलेल्या नवनवीन पद्धती, तंत्रज्ञान, अधिक उत्पादन देणाऱ्या जाती, खते,शेतीविषयक सेवांची अद्ययावत माहिती घेण्याची आणि त्यांचा उपयोग करण्याची शेतकऱ्यामध्ये जागरूकता निर्माण होऊ लागली आहे. याबरोबरच अवजारे, यंत्रे, ट्रॅक्टर्स यासारख्या शेतीचा खर्च कमी करणाऱ्या यंत्रसामुग्रीची खरेदी करण्याच्या पर्यायालाही शेतकरी वर्ग प्राधान्य देत आहे. अॅग्रोव्हिजनच्या कृषी प्रदर्शनात आधुनिक शेतीसाठी या सर्वांचा समावेश असल्याने शेतकऱ्यांचा नेहमीच मोठा प्रतिसाद मिळतो

अॅग्रोव्हिजन हे मध्य भारतातील एकमेव आणि सर्वात मोठे कृषी प्रदर्शन आहे जेथे शेतकऱ्यांना अपेक्षित असलेली सर्व उत्पादने आणि यंत्रसामुग्री केवळ बघायलाच नव्हे तर त्यांचे प्रात्यक्षिक देखील अनुभवायला मिळते. त्यामुळेच या मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शनाला विदर्भ, मराठवाड्यातील सर्व जिल्हे, लगतच्या मध्यप्रदेशातील जिल्हे, छत्तीसगड, आंध्रप्रदेश तसेच हरिय़ाणा, उत्तरप्रदेश इ. ठिकाणाहून लाखो शेतकरी हे प्रदर्शन पाहण्यासाठी गेली ७ वर्षे आवर्जुन भेट देतात. शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, अवजारे, बी-बियाणे, खते, कीडनाशके याबरोबरच उपलब्ध असलेल्या शेतीविषयक सेवांची अद्यावत माहिती व प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना पहायला मिळतात. प्रदर्शनात विविध कृषीपयोगी उत्पादनांचा सहभाग होत असून शेतीशी संबंधित सर्वांना यात सहभागी होण्याची संधी मिळते, प्रदर्शनात महाराष्ट्र शासनाचे अनेक विभाग, कृषी उद्योग, व्यापार समुह, कृषी विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था इ. चा सहभाग असतो. गेल्या अॅग्रोव्हिजन प्रदर्शनाला विदर्भ आणि शेजारील राज्यांतील लाखो शेतकऱ्यांनी भेट दिली. यातून अनेक शेतकऱ्यांना थेट कंपन्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्य़ाची संधी तर मिळाली, शिवाय शेतीउपयुक्त अवजारे आणि यंत्रांची उपलब्धता देखील झाली. प्रदर्शनात सहभागी उत्पादकांना यातून शेतकऱ्यांच्या गरजा माहिती होतात. लाखो शेतकऱ्यांची मागणी समजण्यास मदत होते. प्रदर्शनाचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे जागतिक स्तरावर शेतीक्षेत्रात कोणते सुधारित तंत्रज्ञान विकसित झाले आहे, याची माहिती होऊन त्याबाबत भागीदारी करून व्यापार-व्यवसाय वाढविण्यास मदत होते. अॅग्रोव्हिजन प्रदर्शनाचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे जागतिक स्तरावर शेतीक्षेत्रात कोणते सुधारित तंत्रज्ञान विकसित झाले आहे, याची माहिती होऊन त्याबाबत भागीदारी करून व्यापार-व्यवसाय वाढविण्यास मदत होते.

गेल्यावर्षी ७ व्या अॅग्रोव्हिजन प्रदर्शनास महाराष्ट्र आणि इतर राज्यातील सुमारे ५लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी भेट दिली आणि दरवर्षी ही संख्या वाढतच जात आहे.

३०० पेक्षा अधिक कृषी उत्पादक आणि सेवा संस्थांचा सहभाग ७ व्या अॅग्रोव्हिजन प्रदर्शनामध्ये सहभागी उत्पादकांत देशभरातील विविध क्षेत्रातील घटकांचा सहभाग होता . कॉर्पोरेट क्षेत्र, केंद्र, राज्य सरकारचे विभाग, सार्वजनिक क्षेत्रातील संस्था, स्वयंसेवी संस्था, कृषी संबंधित माहिती देणाऱ्या संस्था, सेंद्रिय तसेच रासायनिक खतांच्या कंपन्या,शेतीअवजारे आणि यंत्रे, गुंतवणूकदार तसेच शेतीशी संलग्न, असंलग्न असणारे सर्व घटक. या सर्वांनी आपापली उत्पादने, सेवा शेतकऱ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध केली होती आवश्यक तेथे प्रात्यक्षिकही दाखवण्यात येत होते. या सर्वांनाच शेतकऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.

उत्पादने आणि सेवा यांचे वैविध्य आणि रूपरेषा बियाणे, खते, कीडनाशके, सिंचन पद्धती, कृषी सेवा, कृषी वित्त, ग्रीनहाऊस, शेडनेट, पाणलोट विकास, लागवडीची पिके, जैवइंधन पिके, फळे, फुले, शीतगृह, सेंद्रीयशेती, औषधी व सुगंधी वनस्पती, पाणलोट व्यवस्थापन, करार शेती, एकात्मिक शेती, कॉर्पोरेट, मत्स्यशेती, कुक्कुटपालन, दूग्धव्यवसाय, रेशीमशेती, पशुपालन, कृषी जैवतंत्रज्ञान, कृषी उद्योग, व्यापार समुह, स्वयंसेवी संस्था, मार्केटींग, शेती अवजारे व यंत्रे, अपारंपारिक उर्जा, काढणीपश्चात तंत्रज्ञान, अन्नप्रक्रिया, कृषीव्यवसाय, कृषीव्यापार, कृषी मालाचे मूल्यवर्धन, बीजोत्पादन, जनुकीय सुधारित तंत्रज्ञान, उतीसंवर्धन, शासन विभाग, संशोधन व विकास संस्था, कृषी विद्यापीठे, केंद्र व राज्य सरकार अशासारखी अनेक उत्पानांचा आणि सेवांचा समावेश

फेसबुक

ट्विटर

संयोजक

माध्यम प्रायोजक